बालोद्यान
अनाथ, वंचित आणि भटक्या मुलांसाठीचं हक्काचं घरकुल..
बालोद्यान हा विद्यार्थी विकास प्रबोधिनी द्वारे चालवला जाणारा अनाथ वंचित आणि भटक्या मुलांच्या संपूर्ण विकासासाठी चा सामाजिक प्रकल्प आहे. विद्यार्थी विकास प्रबोधिनी ही संस्था नोंदणीकृत सार्वजनिक धर्मदाय संस्था आहे.
आमच्याविषयी
ध्येय विधान
विद्यार्थ्यांचे संपूर्ण पालकत्व आणि त्यांची जबाबदारी यामध्ये त्यांचे पालन पोषण, आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, करियर स्वावलंबन आणि संपूर्णता यांचा समावेश आहे. ही संपूर्ण जबाबदारी संस्थेची आहे. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेने कृतीबद्ध कार्यक्रम आखला आहे आणि त्या द्वारे वाटचाल सुरू आहे. यामध्ये त्यांचा शैक्षणिक बौद्धिक मानसिक शारीरिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास अपेक्षित आहे.
मूळ मूल्ये आणि विश्वास
संस्थेचे सर्व प्रकल्प आणि कामकाज संपूर्णपणे लोक सहभागावर चालवले जाते. यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक निधी घेतला जात नाही. संस्थेवर कुठल्याही प्रकारचे कोणताही खाजगी व कौटुंबिक माझी हक्क नाही. संस्थेचे सर्व विश्वस्थ सल्लागार कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे आर्थिक लाभ म्हणजे वेतन व भत्ते इत्यादी घेत नाहीत. संस्थेचे दैनंदिन कामकाज कुशल व अनुभवी कर्मचाऱ्यांद्वारे चालवली जाते. मुलांच्या प्रवेशा मध्ये जात धर्म इत्यादी निकष न लावता गरजू व होतकरू मुलांना प्रवेश दिला जातो. कोणत्याही राजकीय पक्ष व राजकीय घडामोडी पासून संस्था पूर्णपणे अलिप्त आहे. संस्थेची सदर दोन एकर जागा जिल्हा प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पूर्ण केल्यानंतर अटी व नियम घालून उपरोक्त उद्देशासाठी संस्थेला हस्तांतरित केलेली आहे.
चला.. कुणाचे तरी पंख होऊया..
तुमची उदार मदत, गरजू मुलांना प्रेम, काळजी आणि आशा देईल, त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करेल.
विद्यार्थी शिक्षण दत्तक
योजना
नाही.. तुम्ही ह्या मुलांना दत्तक घ्यायचं नाहीये… त्यांचं पालनपोषण ही संस्थेची जबाबदारी आहे… त्यांचं ‘शिक्षण’ दत्तक घ्या.. तुम्ही फक्त एका मुलाच्या एका शैक्षणिक वर्षाचा खर्च द्या..
तुमचा वर्षातला एक दिवस… तुमचा वाढदिवस !
बालोद्यानला भेट द्या.. तुमच्या किंवा तुमच्या प्रियजनांच्या वाढदिवसाला तुम्ही एक दिवस आमच्या मुलांसोबत घालवु शकला तर आम्हाला खूप आनंद होईल..
दिवस आहार दत्तक
योजना
अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. जर आपल्यामुळं अशी पन्नास मुलं तृप्त आणि समाधानी होणार असतील तर अजुन काय हवं..?
सेवा आणि कार्य
बालोद्यान परिवाराचे सेवा आणि कार्य मर्यादित नाही बालोद्यान अनेक उपक्रम राबवत आहे .
सेवा आणि कार्य
अब्दुल लाटच्या वैभवशाली गाव तलावाचा कायापालट केला गाव तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याचं उदात्त ध्येय समोर ठेवून ग्रामविकासाच्या माध्यमातून श्रमदान केले.
ज्ञानदीप
बालोद्यान परिवार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्याला सुजाण नागरिक बनवणे मुलांना आनंददायी शिक्षण देत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवते.
निवारा
बिरनाळे सरांचा कोल्हापुरमधली पुरग्रस्तांना केलेले आवाहन… बरोबर १४ वर्षांनंतर आज पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसलाय…
बालोद्यान घरकुल
बालोद्यान घरकुलने विद्यार्थ्यांचे संपूर्ण पालकत्व आणि त्यांची जबाबदारी घेतली आहे. यामध्ये त्यांचे पालन पोषण, आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, स्वावलंबन व स्वयंपूर्णता याचा समावेश आहे.
हॉल ऑफ फेम
हॉल ऑफ फेम, मुले लवचिकता आणि आशेचे दिवे म्हणून चमकदारपणे चमकतात, अटूट दृढनिश्चयाने प्रतिकूलतेला तोंड देतात, आपल्या सर्वांना प्रेरणा देतात.
चौरस जोडुया.. चौकट तोडूया…
‘फिनिक्स’ गौरी काळे
‘आयुष्य चौकटीबाहेर जात नाहीये’ असं रडगाणं आपण गाताना, कुणीतरी ह्या सुरक्षित चौकटीसाठी सुद्धा आसुसलेलं असतं.. कोल्हापूरमधल्या हरोली गावातली कुणी एक काळे नावाची बाई ‘दारिद्र्याच्या चौकटीत पिसून’ एकटीच चार मुलांच्या संसाराचा गाडा ओढत असते. तिची गौरी नावाची लहान मुलगी आई पाण्याची चौकट ओढून …
बालोद्यान म्हणजे फक्त वसतीगृह नाही…
शुभम पाटील
आपला शुभम पाटील बालोद्यानच्या घरकुलात लहानाचा मोठा झाला..
इथुनच दहावी झाल्यानंतर त्यानं आयटीआय पूर्ण केलं आणि तीन वर्ष इंटर्नशीप आणि नोकरी केल्यानंतर शुभम आता किर्लोस्कर ह्या ख्यातनाम कंपनीत नोकरीस लागला आहे… हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालं..
क्षणचित्रं
आपल्या सर्वांच्या मोठ्या सहकार्याबद्दल आणि योगदानाबद्दल अनेक धन्यवाद
संस्थेचे आधारस्तंभ
संस्थेचे सर्व विश्वस्थ सल्लागार आणि आधारस्तंभ हे निस्वार्थी भावनेने संस्थेसाठी त्यांचा सेवाभाव अर्पण करत असतात.
श्री. कुलभूषण बिरनाळे
आंतरराष्ट्रीय उद्योग, तंत्रज्ञान आणि व्यापार निर्मिती क्षेत्रातील उद्योजक. इन्फोसिसचे माजी वरिष्ठ तंत्रज्ञान अधिकारी
श्री. किरण चौगुल
उद्योजक
श्री. मनोज शेडबाळे
उद्योजक
श्री. सुरेश कारदग
वरिष्ठ लिपिक, लाट हायस्कूल
डॉ. सौ. सपना आवाड
मानद सचिव, डी. के. टी. ई. शिक्षण संस्था, इचलकरंजी
सौ. भारती चंगेडीया
समुपदेशक आणि महिला सबलीकरण कार्यकर्ती
प्रा. सौ. कांचन पाटील
अध्यापक,
देवचंद कॉलेज, निपाणी
श्री. संजय खूळ
वरिष्ठ पत्रकार, दैनिक सकाळ
श्री. संजय कोले
कर सल्लागार
श्री. संतोष पाटील
अकाउंट सल्लागार
श्री. संजय भोजे
प्राथमिक शिक्षक
श्री. मनोज सोमाणी
उद्योजक
आमच्याशी संपर्क साधा
बालोद्यान स्वयंसेवा करण्याच्या आपल्या स्वारस्याबद्दल धन्यवाद आणि निश्चितपणे आपण फरक करू शकता.
९८८१२ ०१२३२
बालोद्यान, अब्दुल लाट, जिल्हा कोल्हापुर, महाराष्ट्र ४१६१३०
editor@balodyan.org
Balodyan is a HOME for nomadic and orphaned children governed by Vidyarthi Vikas Prabodhini.